३०० परदेशी पक्षांची तस्करी, डीआरआयचे ७ ठिकाणी छापे

कर्जत, गोवंडी, बैंगणवाडी, ओपेरा हाऊस, क्रॉफर्ड मार्केट, चेंबूर, कुर्ला, चेंबूर आदी ठिकाणी परदेशी पक्षी बंदिस्त ठेवण्यात आले असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.

३०० परदेशी पक्षांची तस्करी, डीआरआयचे ७ ठिकाणी छापे
SHARES
मुंबईसह विविध ठिकाणांहून परदेशी पक्षांची विक्री करणाऱ्या ठिकाणी डीआरआयनं (केंद्रीय महसुल गुप्तचर संचलनालय) कारवाई करत, ३०० हून अधिक परदेशी पक्षांची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांनी हे पक्षी अनधिकृतरित्या पाळल्याचं समोर आलं.


परदेशी पक्षी बंदिस्त

कर्जत, गोवंडी, बैंगणवाडी, ओपेरा हाऊस, क्रॉफर्ड मार्केट, चेंबूर, कुर्ला, चेंबूर आदी ठिकाणी परदेशी पक्षी बंदिस्त ठेवण्यात आले असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार, डीआरआयच्या विविध पथकांनी एकाच वेळी या सर्व ठिकाणांवर छापेमारी केली असता त्यांना ३०० हून अधिक परदेशी पक्षी सापडले. या पक्षांंना बाजारात मोठी मागणी असल्यानं त्याची तस्करी केली जाते. डीआरआयला मिळालेल्या पक्षांमध्ये कोकाटूस, अफ्रिकन पोपट, लव्ह बर्ड, फ्लेमिंगो या पक्षांचा समावेश आहे.


मोठी कारवाई

या प्रकरणी डीआरआयनं चौघांना अटक केली आहे. आतापर्यंतची ही डाआरआयची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय डीआरआयच्या पोलिसांना असून त्या अनुषंगाने ते तपास करत आहेत.



हेही वाचा -

बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या - कपिल पाटील

आता एकवीस नाही, वीस एक म्हणा, बालभारतीच्या पुस्तकात अजब बदल



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा