Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या - कपिल पाटील

बालभारतीच्या इयत्ता दुसरी गणिताच्या पुस्तकात बदल करण्यात आले आहेत. आता 'बत्तीस'ऐवजी 'तीस दोन', असं म्हणायचं असं या पुस्तकात दिलं आहे. त्यामुळं लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणाच्या धोरणावरून राज्य सरकार आणि शिक्षण मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या - कपिल पाटील
SHARES

बालभारतीच्या इयत्ता दुसरी गणिताच्या पुस्तकात बदल करण्यात आले आहेत. आता 'बत्तीस'ऐवजी 'तीस दोन', असं म्हणायचं असं या पुस्तकात दिलं आहे. त्यामुळं लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणाच्या धोरणावरून राज्य सरकार आणि शिक्षण मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'राज्य सरकारनं बालभारतीच्या पुस्तकात केलेल्या बदलासंदर्भात मी तज्ज्ञांचा सल्ला घेतला, जेव्हा मी ही गोष्ट शिक्षण तज्ज्ञांना सांगितली तेव्हा तेसुद्धा उडाले. शिक्षणाचा विनोद झाला आहे, मराठी मारण्याचा सरकारचा डाव आहे, बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या’, अशा शब्दांत कपिल पाटील यांनी टीका केली आहे.

जोडाक्षरं कठीण

दुसरीच्या गणित पुस्तकातील संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असं वाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठी जोडाक्षरं कठीण असल्याचा सांगत बालभारतीनं या नव्या पद्धतीची अंमलबजावणी केली आहे. पुस्तकात नवी व जुनी पद्धत अशा दोन्ही स्वरुपात मांडणी देण्यात आली आहे. तसंच, शिक्षकांनी नवीन पद्धतीनं शिकवावं, अशा सूचना देखील शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

पालक संभ्रमात

शालेय विद्यार्थ्यांचा या सर्व प्रकारामुळं गोंधळ तर उडाला आहे, त्याचप्रमाणं पालकही संभ्रमात पडले आहेत. संख्या वाचनासाठी ३ पद्धती देण्यात आल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना जी सोपी वाटते ती पद्धत वापरता येऊ शकते. इंग्रजीतील संख्या वाचनपद्धतीनुसार ही पद्धत करण्यात आली आहे.हेही वाचा -

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मंत्रिपदावरुन उच्च न्यायालयात याचिका दाखल

बालभारतीच्या इयत्ता दुसरी गणिताच्या पुस्तकात बदलसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा