चोरीसाठी मेहुणीनेच आखला हत्येचा प्लॅन

 Masjid Bandar
चोरीसाठी मेहुणीनेच आखला हत्येचा प्लॅन

मस्जिद बंदर - पायधुनी पोलीस स्टेशनच्या पथकाने साई मंझिल, ईस्माईल मोहल्ला येथे झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूचे गूढ 5 तासांच्या आत उकलले आहे. 72 वर्षीय इक्बाल मोहम्मद शाह दरवेज यांचा संशयास्पद मृत्यू शनिवारी झाला. मात्र अधिक तपासात हा मृत्यू चोरीच्या उद्देशाने झाल्याचे समोर आले. मोहम्मद शाह दरवेज यांच्या तोंडात कापसाचा गोळा कोंबून त्यांचे हात-पाय बांधून त्याच्या हातातील अंगठी आणि 15000 रूपये घेऊन हल्लेखोर पसार झाले होते. मात्र हा सगळा प्लॅन त्यांच्या घटस्फोटीत बायकोच्या बहिणीने आखल्याचे समोर आले. तिचे दोन साथीदार आणि ती अशा तिघांनी मिळून हा प्लॅन आखल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान अधिक तपास पोलीस करत असून, पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.

Loading Comments