मोबाईल हा लोकांचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. सध्याच्या काळात मोबाईल नसेल तर काम जलद गतीनं होत नाहीत. तसंच, प्रवासावेळी देखील मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर केला जातो. अशावेळी अनेकदा नवे अॅप प्ले स्टोअरमध्ये आल्याची माहिती मिळते. असचं एक नवं अॅप प्ले स्टोअरमध्ये आलं आहे. हे अॅप मोबाईलमध्ये असल्यास तुमचं बँक खातं संपुर्ण रिकामं होण्याची शक्यता आहे. याबाबत सेक्युअर डी टीमकडून एक सर्व्हे करण्यात आला. या सर्वेमध्ये ‘ai.type’ अशा नावाचं एक अॅप सापडलं आहे. ‘ai.type’ हे अॅप जर मोबाईलमध्ये असेल तर तुम्हाला कळण्यापूर्वीच तुमच्या खात्यातून पैसे जातील.
ऑनलाइन सुविधांमुळे अनेक कामं काही मिनिटांमध्येच होतात. गुगल प्ले स्टोअरवरून अनेक सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करता येतात. मात्र, ‘ai.type’ यांसारखे अॅप इंस्टॉल करण्यापूर्वी त्या अॅप संदर्भात माहिती घेणं बंधनकारक असतं. दरम्यान, ‘ai.type’ हे अॅप युझरच्या परवानगीशिवाय प्रमिअम डिजिटल सर्व्हिस खरेदी करत असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच याद्वारे प्रिमिअम डिजिटल कंटेंट खरेदी केल्याचं युझरलाही समजत नाही.
‘ai.type’
हे
अॅप मोबाईलच्या बॅकग्राऊंडला
काम करतं.
तसंच
युझरच्या माहितीशिवाय यामध्ये
खोट्या जाहीरातीही दाखवल्या
जातात.
त्यातच
अॅपद्वारे डिजिटल खरेदी करून
युझरच्या खात्यातून पैसे
भरले जात असल्याचं समजतं.
हे
अॅप आतापर्यंत ४ कोटी मोबाईल
युझर्सनं डाऊनलोड केल्याची
माहिती मिळते आहे.
इस्त्रायलमधील कंपनी ai.type LTD नं हे अॅप तयार केलं आहे. या अॅपचं डिस्क्रिप्शन Free Emoji keyboard असं दिलं आहे. आतापर्यंत या अॅपद्वारे युझर्सची १२७ कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. सध्या १३ देशांमध्ये हे अॅप युझर्सकडून वापरण्यात येत आहे.
हेही वाचा -
भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप
देवेंद्र फडणवीस देणार का मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ?