बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर अात्महत्या


बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर अात्महत्या
SHARES

रविवारी दुपारी एका व्यक्तीने मालाड येथील  इनऑर्बिट मॉलवरून उडी टाकून अात्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र, मृत व्यक्तीची चौकशी केली असता पोलिस हैराने झाले. कारण या मृत व्यक्तीविरोधात त्याच दिवशी म्हणजे रविवारी एका महिलेने तिची छेड काढण्याचा अाणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा अारोप केला होता. त्यामुळे या व्यक्तीचा पोलिस शोध घेत होते.




काय अाहे प्रकरण?

रविवारी बांगुरनगर पोलिस ठाण्यात एक महिलेने तक्रार केली होती की, तिच्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने अारडाओरड करताच त्या व्यक्तीने महिलेच्या डोक्यात कोणतीतरी जड वस्तू मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अाजूबाजूचे लोक य़ेईपर्यंत अारोपी फरार झाला होता.


मृताविरोधात महिलेची तक्रार

या घटनेनंतर महिलेने बांगुरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अारोपीचा शोध सुरू केला. अचानक पोलिसांना इनऑर्बिट माॅलवरून कोणीतरी अात्महत्या केल्याची माहिती मिळाली.  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अात्महत्या केलेल्या व्यक्तीची माहिती घेतली असता, महिलेने ज्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती तो हाच अारोपी असल्याचं उघड झालं.


मृत व्यवसायाने डाॅक्टर 

यासंदर्भात पोलिसांनी सांगितलं की, अात्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव शिरीन एलेन असून तो डाॅक्टर होता. तो गोरेगाव येथील साई प्रसाद इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत होता. याच इमारतीत ही महिला राहत असून ती व्यवसायाने डाॅक्टर अाहे. रविवारी सकाळी बाहेरून ही महिला अापल्या घरी येत होती तेव्हा शिरीनने तिचा पाठलाग केला. तिच्याबरोबर तो लिफ्टमध्येही अाला. जेव्हा महिला घरात गेली तेव्हा तोही जबरदस्तीने घरात घुसला.



हेही वाचा -

चोरट्यांना ऑनलाईन शॉपिंग पडली महागात

मुंबई विमानतळावर 18 किलोचं सोनं हस्तगत





Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा