डोंबिवली : धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक

डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडला.

डोंबिवली : धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अटक
SHARES

डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये विवाहित महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली आहे.

हरिशकुमार सुदुला (२७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो विक्रोळी पूर्व येथील रहिवासी आहे.

जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पती आणि मुलांसोबत घाटकोपर भागात राहते तर आरोपी सुदुला टागोर नगर, विक्रोळी पूर्व येथे राहतो. पीडित विवाहित महिला आपल्या पती आणि मुलांसह घाटकोपरहून डोंबिवलीत नातेवाईकाला भेटण्यासाठी आली होती. आरोपी कामानिमित्त डोंबिवलीत आला  होता. 

23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पीडित महिला डोंबिवलीहून घाटकोपरला जाणाऱ्या फास्ट लोकलच्या जनरल डब्यात पती आणि मुलांसह प्रवास करत होती. त्याचवेळी सुदुलाही त्याच जनरल डब्यातून प्रवास करत होता.

डोंबिवली स्थानकावर डब्यात चढत असताना आरोपीने पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान लोकलच्या गर्दीचा फायदा घेत सुदुलाने पुन्हा पीडितेजवळ जाऊन तिचा विनयभंग केला.

लोकल ट्रेन घाटकोर स्थानकावर आल्यानंतर सुदुलाने डब्यातून खाली उतरताना पुन्हा  विनयभंग केला आणि तेथून पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिला घाबरली आणि तिने पतीला हा प्रकार सांगितला.

पीडितेने 24 ऑक्टोबर रोजी दुपारी डोंबिवली जीआरपी पोलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354, 354 (ए) अन्वये गुन्हा दाखल केला.



हेही वाचा

मुंबई : इंनस्टाग्राम रील्स बनवल्याप्रकरणी दोन रेल्वे पोलीस निलंबित

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा