मुंबई : इंनस्टाग्राम रील्स बनवल्याप्रकरणी दोन रेल्वे पोलीस निलंबित

गणवेशात रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

मुंबई : इंनस्टाग्राम रील्स बनवल्याप्रकरणी दोन रेल्वे पोलीस निलंबित
SHARES

पुण्यातील ड्रीम इलेव्हनवर दीड कोटी रुपये जिंकणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची घटना ताजी असतानाच, मुंबईत गणवेशात इंस्टाग्रामवर रील करणाऱ्या दोन रेल्वे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय आणखी दोन रेल्वे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

गणवेशात रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.

मध्य रेल्वे अंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस अधिकारी आणि पश्चिम रेल्वे अंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने नुकताच गणवेशातील एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे तपास सुरू होईपर्यंत या दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गणवेशातील व्यक्तीने शिस्त पाळली पाहिजे. शिस्तभंगाच्या कारवाईसाठी त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

याशिवाय कोचिंक सेंटर चालवल्याप्रकरणी वसई रेल्वे पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सेवा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत योग्य तो संदेश देणे आवश्यक असल्याने वरिष्ठांनी ही कारवाई केली.



हेही वाचा

मुंबई : लैंगिक अत्याचाराला कंटाळून रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा