दुधानीच्या अटकेतून उलगडलं नशिल्या पदार्थांचं जाळं

  Pali Hill
  दुधानीच्या अटकेतून उलगडलं नशिल्या पदार्थांचं जाळं
  मुंबई  -  

  मुंबई - रेव्हेन्यू इंटेलिजन्सला मिळालेल्या माहितीमुळे सुभाष दुधानी याला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर तब्बल 4 हजार कोटींचे अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. मुंबई विमानतळावरून दुधानी परदेशी जाणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

  दुधानीच्या चौकशीतून उदयपूर ते सौदीपर्यंत पसरलेल्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. सुभाष दुधानीच्या उदयपूर येथील तीन कंपन्यांवरही छापे टाकण्यात आलेत. या छाप्यात डीआरआयने 4000 कोटींचा ड्रग्सचा साठा जप्त केला. या छाप्यांतून तब्बल 23 हजार 500 मेट्रिक टन मँड्रेक्स टॅब्लेट जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सुभाषचा भाचा रवीलाही ताब्यात घेण्यात आलंय. हे अंमली पदार्थ सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिकेत पाठवले जात होते.

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.