हिरे व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी चालकाला अटक

घाटकोपर परिसरात राहणारे राजेश्वर उदानी यांना सचिन पवार याने काही दिवसांपूर्वी आर्थिक मदत केली होती. मात्र, व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे उदानी पवारला पैसे देऊ शकत नव्हते.

हिरे व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी चालकाला अटक
SHARES

 घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्‍वर उदानी यांच्या हत्येच्या तपासात आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रणीत भोईर या चालकाला अटक केली आहे. उदानी यांची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रणीतनेच जागा दाखवल्याचं चौकशीत पुढं आलं आहे.


हनी ट्रॅपचा वापर

घाटकोपर परिसरात राहणारे राजेश्वर उदानी यांना सचिन पवार याने काही दिवसांपूर्वी आर्थिक मदत केली होती. मात्र, व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे उदानी पवारला पैसे देऊ शकत नव्हते. काही दिवसांपासून पवारने पैशांसाठी उदानी यांच्याजवळ तगादा लावला होता. दोघांमध्ये या कारणावरून वाद होत असल्याने उदानी यांना अडकवण्यासाठी हनी ट्रॅपचाही वापर केला.


हनी ट्रॅप फसला

वाद विकोपाला गेल्याने सचिनने उदानी यांचा काटा काढण्याचा कट रचला. २८ नोव्हेंबरला दिनेश पवार हा गाडीतून उदानी यांना घेण्यासाठी त्याच्या घराजवळ आला होता. त्यावेळी त्याच्या गाडीत एक बारबालाही होती. मात्र हनी ट्रॅप फसल्यानंतर सचिन, दिनेश आणि प्रणीतने संगनमताने उदानींचा काटा काढला. मात्र सचिनचे वकील समाधान सुलाने यांनी या प्रकरणात सचिनचा काहीही संबंध नसून हत्या झाली त्यावेळी तो गाडी उपस्थित नव्हता, असं सांगितले आहे. 


महिलेची कार

हत्येनंतर गाडी प्रणीत चालवत होता. पनवेलचाच रहिवाशी असलेल्या प्रणीतने नेहरे गावाजवळ मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींना मार्गदर्शनही केले. यावेळी वापरण्यात आलेली कार ही चारकोप येथील महिलेची असल्याचं तपासात पुढं आलं आहे. ज्या महिलेची ही गाडी आहे ती फेसबुकद्वारे दिनेशच्या संपर्कात आल्याचे समोर अाले. विशेष म्हणजे या हत्येनंतर पोलिसांचे लक्ष विचलीत करण्यासाठी आरोपींनी गाडीची नंबरप्लेट बदलून ११११ नंबर असलेली नंबरप्लेट लावली. ही नंबरप्लेट दिनेशने त्याच्या मित्रांकडून घेतली.


मंगळवारी न्यायालयात

 दिनेश पवार व भोईरला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय याप्रकरणी आरोपींना रेकी करण्यात मदत करणारा घाटकोपरमधील तरूणही पोलिसांच्या रडावर आहे. त्याची चौकशी सुरू असून हत्येचा त्याचा सहभाग अद्याप आढळला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हेही वाचा - 

ईएमआयवर मोबाइल घेत असाल तर सावधान!

मुंबईत अवघ्या ३ मिनिटांत जाते कार चोरीला
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा