ईएमआयवर मोबाइल घेत असाल तर सावधान!

बजाज फायनान्स कंपनी विविध शोरूम आणि डिलर्सला ग्राहकांना वस्तू घेण्यासाठी कर्ज देण्याचे काम करते. याबाबतची माहिती एका इलेक्ट्राॅनिक्स कंपनीत काम करणाऱ्या रमिज शेख याला होती. तेथील नोकरी सोडल्यानंतर रमिजने त्या शोरूमला देण्यात आलेल्या वेब अकाऊंटवरील पासवर्डच्या मदतीने डाटा चोरल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस अालं.

ईएमआयवर मोबाइल घेत असाल तर सावधान!
SHARES

बजाज फायनान्स कंपनीच्या वेबपोर्टलवरील नागरिकांची माहिती चोरून त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून आॅनलाईन शाॅपिंग करणाऱ्या तिघा जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अबूबकर मोहम्मद साब शेख घानविलकर (४५), रमिज मोहम्मद हुसेन शेख (२७), राजेश बाबूराव वडलुरी (३७) अशी या आरोपींची नावे आहेत. या तिघांबरोबरच या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


ईएमअायवर मोबाइल

कुर्ला नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या गिरीष बने यांनी २० जून रोजी नायगाव भोईवाडा मार्केट येथील भवल इलेक्ट्राॅनिक्स येथून २९ हजार रुपयांचा मोबाइल बजाज फायनान्स कंपनीकडून ईएमआयवर घेतला. मोबाइल घेताना बने यांनी फायनान्स कंपनीला अभ्युदय बँकेचा चेक दिला. त्यानुसार३६२५ रुपयांच्या ईएमअायवर हा मोबाइल बने यांनी मागवला होता. मात्र, २१ जून रोजी बने यांच्या घरी सी.पी.पी.ग्रुप इंडिया कंपनीकडून मोबाइल घेऊन एक व्यक्ती आला. बने यांनी यावेळी आपण या कंपनीकडून कोणताही मोबाइल मागवला नसल्याचं सांगितलं. त्यावर कंपनीच्या व्यक्तीने बने यांना त्यांच्या नावावर ३ सॅमसंग मोबाइल विकत घेण्यात आल्याची माहिती दिली. 


वेबसाईटवरून माहिती चोरली

बने यांनी भवल इलेक्ट्राॅनिक्समध्ये चौकशी केल्यानंतर बने यांना आपली फसवणूक करण्यात आल्याची खात्री पटली. आरोपींनी बजाज फायनान्स कंपनीच्या वेबसाईटवरून बने यांची माहिती चोरून बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड बनवले. त्या अाधारे अंबरनाथच्या रिद्धी सिद्धी इलेक्ट्राॅनिक्स शाॅपमधून बने यांच्या नावाने १ लाख ४४ हजार रुपयांचे ३ मोबाइल विकत घेतल्याचे उघडकीस अाले.  


बनावट कागदपत्रं 

 बजाज फायनान्स कंपनी विविध शोरूम आणि डिलर्सला ग्राहकांना वस्तू घेण्यासाठी कर्ज देण्याचे काम करते. याबाबतची माहिती एका इलेक्ट्राॅनिक्स कंपनीत काम करणाऱ्या रमिज शेख याला होती. तेथील नोकरी सोडल्यानंतर रमिजने त्या शोरूमला देण्यात आलेल्या वेब अकाऊंटवरील पासवर्डच्या मदतीने डाटा चोरल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस अालं.  या डाटाच्या मदतीने बनावट कागदपत्रं बनवून या तिन्ही आरोपींनी विविध ठिकाणाहून महागड्या इलेक्ट्राॅनिक्स वस्तू खरेदी केल्या. 


३३ लाखांची फसवणूक

 या आरोपींविरोधात मुंबईतील ५ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून या टोळीने कल्याण, भाईंदर, या ठिकाणीही अशाप्रकारे तब्बल ३३ लाख रूपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. या टोळीविरोधात आतापर्यंत १५ गुन्हे उघडकीस आले असून त्यांचा २२ प्रकरणात सहभाग निश्चित होत आहे. या प्रकरणी मालमत्ता विभाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा - 

मुंबईत अवघ्या ३ मिनिटांत जाते कार चोरीला

घाटकोपर विमान दुर्घटना- कंपनीचं लायसन्स रद्द




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा