मुंबईत अवघ्या ३ मिनिटांत जाते कार चोरीला

हजरत त्याच्या साथीधारांच्या मदतीने मुंबईत रात्रीच्या वेळी कार चोरी करण्यासाठी बाहेर पडायचा. निर्जनस्थळी उभ्या असलेल्या महागड्या गाड्यांच्या शेजारीच गाडी उभी करून मदतीने चावीचा छाप घेऊन तो जागेवरच ३ मिनिटांत चावी कोरून गाड्या चोरायचा.

मुंबईत अवघ्या ३ मिनिटांत जाते कार चोरीला
SHARES

मुंबईतील रस्त्यांवरून अवघ्या ३ मिनिटांत कार चोरीला जात असल्याचं आरोपींच्या चौकशीतून पुढं आलं आहे. कार ही ‘मुव्हिंग प्रॉपर्टी’असल्यामुळे कार चोरांचा शोध घेणं पोलिसांसाठी देखील डोकेदुखीचं ठरत अाहे. काही दिवसांपूर्वी प्राॅपर्टी सेलच्या अधिकाऱ्यांनी कुर्ला परिसरात राहणाऱ्या हजरत अलीला कार चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्या चौकशीतून जागेवरच बनावट चावी बनवून ३ मिनिटांत कार चोरता येत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.


रिकव्हरीचं प्रमाण नगण्य

शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. शहरात ६ हजार सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचं जाळं उभारूनसुद्धा दिवसाढवळ्या कार चोरीला जावू लागल्या आहेत. चालू वर्षातील १० महिन्यांत २ हजार ६९४ वाहने चोरीला गेल्याची नोंद असून त्यापैकी केवळ १ हजार वाहनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. गेल्या वर्षी मुंबईतून ३ हजार १२ वाहने चोरीला गेली होती. यापैकी ९३५ वाहने शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं होतं. हजरत अलीने कार चोरीची टेक्निक पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.


'अशी' होते कारचोरी

हजरत त्याच्या साथीधारांच्या मदतीने मुंबईत रात्रीच्या वेळी कार चोरी करण्यासाठी बाहेर पडायचा. निर्जनस्थळी उभ्या असलेल्या महागड्या गाड्यांच्या शेजारीच गाडी उभी करून मदतीने चावीचा छाप घेऊन तो जागेवरच ३ मिनिटांत चावी कोरून गाड्या चोरायचा. हजरतने दिलेल्या मासाबणाच्या हितीनंतर पोलिसांनी अशा सराईत आरोपींची नावे काढून त्यांची धरकड सुरू केली. हे चोरटे बहुतांशी सुमो, क्वालिस, टवेरा, स्काॅर्पिओ या सारख्या गाड्या चोरत असल्याचे माहिती पोलिसांनी दिली.


इतर शहरांचं प्रमाण

मुंबईतून चोरण्यात येणाऱ्या कार मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, नोएडा, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, कोलकाता, झारखंड, ओडिशा, आसाम व नेपाळमध्येही विकण्यात येतात. देशातील इतर शहरांच्या तुलनेत कमीच आहे. दिल्लीत दररोज सरासरी ४० गाड्या चोरीला जातात. त्यापाठोपाठ बंगळुरू आघाडीवर असून तिथं दिवसाला सरासरी १२ गाड्या चोरीला जात असल्याचं आकडेवारी सांगते.हेही वाचा-

वाहतूक पोलिसांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घ्या, कोर्टाची सरकारला सूचना

हिरे व्यापारी हत्याप्रकरण : आरोपींना १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा