हिरे व्यापारी हत्याप्रकरण : आरोपींना १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पोलिसांनी सचिन अाणि दिनेश पवारला रविवारी भोईवाडा येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हिरे व्यापारी हत्याप्रकरण : आरोपींना १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
SHARES

घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी सचिन पवार अाणि दिनेश पवार यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेश्वर हे २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. ४ डिसेंबर रोजी त्यांचा मृतदेह पनवेल येथील नेरे गावाजवळ आढळून आला.


अपहरण करून हत्या 

 या व्यापाऱ्याचं अपहरण करून हत्या केल्याचा संशयावरून पोलिसांनी शनिवारी सचिनला अटक केली. हत्येवेळी निलंबीत पोलिस दिनेश पवार हाही कारमध्ये असल्याचं उघड झालं अाहे. याप्रकरणी अाधी दिनेश पवारला अटक करण्यात अाली होती. त्याच्या चौकशीतून सचिन पवारचे नाव उघडकीस अालं. 


२५ जणांची चौकशी

या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांची चौकशी केली. त्यानंतर राजेश्वर यांच्या मोबाईल रेकॉर्डनुसार मेहता यांचा माजी स्वीय सचिव सचिन पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच सापडलेली कार ही त्याचीच असल्याची माहिती उघड झाली. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचं उघडकीस अालं अाहे. पोलिसांनी सचिन अाणि दिनेश पवारला रविवारी भोईवाडा येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


 प्रकाश मेहता यांचे स्पष्टीकरण 

पवार २००४ ते २०९ दरम्यान मेहता यांचे स्वीय सचिव होते.  मात्र २०११ ते २०१२ च्या दरम्यान जेव्हा पालिकाना निवडणूकीत पक्षाने त्याला उमेदवारी दिली नाही. त्यावेळी त्यांनी अपक्ष फाॅर्म भरला. त्यावेळीच पक्षातून त्याला काढून टाकण्यात आले होते. त्या वेळापासून सचिन हा माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे माझा या घटनेशी काही एक संबध नसल्याचे स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी पत्रकारांना दिले आहे. हेही वाचा - 

व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्र्यांच्या माजी सचिवाला अटक

उदानी हत्येप्रकरणी अभिनेत्री देबोलीना पोलिसांच्या ताब्यात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा