SHARE

गृहनिर्माण मंत्र्यांच्या स्वीय सचिवांपाठोपाठ हिंदी सिरियलमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री देबोलीना भट्टाचार्य हिला मुंबई पोलिसांनी घाटकोपरमधील एका व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यामुळे आता या हत्याप्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'साथ निभाना साथीया' या सिरियलमधील गोपी बहू अशी देबोलीनाची ओळख आहे.


काय आहे प्रकरण?

घाटकोपरमधील सोने व्यापारी राजेश्वर उदानी २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. उदानी यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. राजेश्वर यांचा मृतदेह पनवेलजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडून आल्यावर पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरायला लागली.


गृहनिर्माण मंत्र्यांच्या माजी पीएला अटक

तपासादरम्यान गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सचिव सचिन पवार याची कार पोलिसांना घाटकोपर येथील पूर्व द्रूतगती महामार्गाजवळ बेवारस अवस्थेत आढळून आली. या कारमधूनच उदानी घराबाहेर पडल्याचं तसंच सचिन पवार आणि उदानी यांच्यात उदानी यांच्या मृत्यूआधी फोनवर संभाषण झाल्याचं चौकशीतून समोर आल्यावर पोलिसांनी पवार याला अटक केली होती.

आर्थिक व्यवहारांतून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय असून त्यात एका अभिनेत्रीचंही नाव घेतलं जात होतं. त्यानंतर देबोलीनाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हिंदी कलाकारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

डान्स इंडिया डान्स या प्रसिद्ध डान्स रियालिटी शो मधून चमकलेली देबोलीना स्टार प्लसवरील 'साथ निभाया साथीया' या मालिकेतून नावारूपाला आली. सोशल मीडियावरील हाॅट फोटाे आणि को स्टारसोबत वाद विवादामुळेही ती चर्चेत आली होती.हेही वाचा-

व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्र्यांच्या माजी सचिवाला अटक

अभिनेत्री झरीन खानची माजी मॅनेजरविरोधात खार पोलिसांत तक्रारसंबंधित विषय
ताज्या बातम्या