मुंबईच्या लॉकडाऊनवर पोलिसांच्या 'ऑडीओ ड्रोन'ची नजर

पोलिसांकडे सध्या सहा ड्रोन असून नागरीकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येणार आहे.

मुंबईच्या लॉकडाऊनवर पोलिसांच्या 'ऑडीओ ड्रोन'ची नजर
SHARES

परिसरात जमावबंदी आहे, कायदा हातात घेऊ नका, पोलिसांना सहकार्य करा...कुठल्याही आप्तकालिन परिस्थितीवेळी गर्दीच्या ठिकाणी पोलिस त्यांच्या व्हँनमधील स्पिकरवरून आवाहन करताना आपण अनेकदा पाहिलं आहे. पण ड्रोनच्या सहायाने पोलिस अशा घोषणा बुधवारी पहायलामिळाली. पोलिसांकडे सध्या सहा ड्रोन असून नागरीकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊनचे आदेश दिल्यानंतरही अनेक ठिकाणी नागरीक रस्त्यावर उतरताना दिसत होते. नागरीकांकडून जमावबंदीचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलीस आयुक्तांनी शहरात 188 अन्वये  कारवाई करण्याचे आदेश पोलीस दलाला दिले आहेत.  144 कलमाचे उल्लघन केल्याप्रकरणी शहरात 112 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विलीगीकरण करण्यात आलेल्या तिघांवर, हॉटेल आस्थापना बाबत16, पान टपरी 6, इतर दुकाने53, फेरीवाले 18, सार्वजनिक ठिकाणी गर्दी 10 आणि अवैध वाहतुक संदर्भात 6 गुन्ह्यांचा समावेश आहे. हे सहा कार चालक गरज नसताना तसेच अत्यावश्यक सेवांची वाहने चालू ठेवण्याचा आदेश असतानाही आपल्या गाड्या घेऊन घरात बाहेर पडले होते.  याशिवाय टेमकर स्ट्रीट येथील सुनी शाफी मशीदीत नमाजासाठी दिडशे नागरीक जमा झाल्याप्रकरणीही कलम 188 अंतर्गत मशीदीचे विश्वस्त मजल बडवण कुणी मोहम्मद अणि इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यामुळे अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनोळखी शक्कल वापरत आहेत. लॉकडाऊनचा संदेश नागरीकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिस आता ऑडीओ ड्रोनचा वापर करत आहेत. डोंगरी परिसरातून त्याला बुधवारी सुरूवात करण्यात आली. पोलिसांकडे सध्या सहा ड्रोन असून नागरीकांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येणार आहे.  यापूर्वी मुंबई पोलिसांनी मराठा मूक मोर्चा आंदोलन, कीर्ती व्यास हत्या प्रकरण, गणेशोत्सवात ड्रोनद्वारे गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवली होती. मात्र, राजकीय घडामोडींसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी पोलिसांना सिंगापूरच्या कंपनीकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यापूर्वी मराठा आंदोलन, कीर्ती व्यास हत्या प्रकरण, गणपतीत मुंबई पोलिसांनी ड्रोनचा वापर केला होता. शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट दिली त्यावेळी प्रथम या ऑडिओ ही यंत्रणाही गणेशोत्सवाच्या काळातच मुंबई पोलिस दलाने सामील केली होती.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा