SHARE

कांदिवली - नशेच्या औषधांची तस्करी करणाऱ्या किशोर नंदन याला कांदिवली पोलिसांनी सापळा रचून सोमवारी अटक केली. नंदन कांदिवली परिसरात ही औषधं विकायला येणार असल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे प्रदीप केरकर यांना सूत्रांकडून मिळाली होती. त्या आधारे कांदिवली पश्चिमेकडील स्टेशन परिसरातील त्रिंकमदास रोड येथे त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 67 लाख 90 हजार रुपयांचे 1,358 एल.एस.डी. डॉटस, 40 लाख 95 हजारांच्या 1, 365 एक्स्टसी गोळ्या, 4 लाखांची स्कॉर्पियो गाडी असा एकूण 1 कोटी 12 लाख 85 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी ठाण्याचा रहिवासी असून त्याला न्यायालयानं 17 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या