कुर्ला टर्मिनलवर अंमली पदार्थांची तस्करी


कुर्ला टर्मिनलवर अंमली पदार्थांची तस्करी
SHARES

लाँकडाऊनच्या काळात  मुंबईत पोलिसांचा नाक्या नाक्यावर चोख बंदोबस्त असल्यामुळे तस्करांना ड्रग्जची तस्करी करता येत नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेऊन तस्करांनी गर्दीची ठिकाणं तस्करीसाठी नेमल्याचं NCBने केलेल्या कारवाईतून समोर आलं आहे.  कुर्ला (Kurla) लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात अंमली विरोधी पथकाने (Narcotics Control Bureau - NCB) धडक कारवाई करत तब्बल २ कोटी रुपये किंमतीचा चरस (Drug) जप्त करण्यात आला आहे. तसंच या कारवाईत एनसीबी पथक आणि रेल्वे पोलिसांनी दोन तरुणांसह एका महिलेलाही अटक केली आहे.

अंमली विरोधी पथक (NCB)ला गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेही कारवाई करण्यात आली. कुर्ला लोकमान्य टिळक र्मिनसमधून (Lokmanya Tilak Terminus - LTT) दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ६ किलो ६२८ ग्रॅम वजनी काश्मिरी चरस हस्तगत करण्यात आले होते. आफताब शेख (२८), साबिर सय्यद अली (३०) आणि शमीम बानो( ३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे, या प्रकरणी एनसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा