माॅडेलचा पोलिसांसमोर धिंगाणा

मुंबईत अंधेरीतल्या ओशिवरा परिसरात माॅडेलने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी समजवल्यानंतरही या मॉडलेने गोंधळ घालत लिफ्टमधून उतरण्यास नकार दिला. शिवाय पोलिसांनांच कायद्याचे धडे शिकवत, त्यांच्यासमोर चक्क स्वत:चे कपडे उतरवण्यास सुरुवात केली.

माॅडेलचा पोलिसांसमोर धिंगाणा
SHARES

अंधेरीतील ओशिवरा परिसरात एका माॅडेलने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी समजवल्यानंतरही या मॉडेलने गोंधळ घालत लिफ्टमधून उतरण्यास नकार दिला. शिवाय पोलिसांनाच कायद्याचे धडे शिकवत, त्यांच्यासमोर चक्क स्वत:चे कपडे उतरवण्यास सुरुवात केली. याप्रकरणाची गंभीर दखल ओशिवरा पोलिसांनी घेतली आहे.


संपूर्ण प्रकार

मुंबईत अंधेरीतल्या ओशिवरा परिसरातील लखारीया इमारतीत ही माॅडेल राहते. शुक्रवारी रात्री घरी आल्यानंतर तिने मद्यप्राशन केलं. काही वेळानंतर दारूच्या नशेत असलेल्या या मॉडेलने इमारतीच्या वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितले. मात्र, त्यावेळी सोसायटीच्या सुरक्षाद्वारावर दुसरा कोणताही वाॅचमन उपस्थित नसल्यामुळे त्याने सिगारेट आणण्यास नकार दिला. यावरून नशेत त्या माॅडेलने वाॅचमनसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर सोसायटीतील सर्व रहिवाशी जागे झाले.


माॅडेलची दादगिरी

मध्यरात्री या माॅडेलचा धिंगाणा सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर ओशिवरा पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्या माॅडेलने पोलिसांवरच दादागिरी करत त्यांना कायद्याचं ज्ञान देऊ लागली. पोलिस तिला लिफ्टबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तिने पोलिसांसमोर कपडे काढून गोंधळ घातला.


पोलिसांवरच केला आरोप

पोलिसांवरच या माॅडेलने आरोप केला की, 'माझी कुठलीही चूक नसताना, मध्यरात्री तीन वाजता मला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यासाठी पोलिस येतात. हेच मुंबई पोलिस आहेत का? सोबत महिला कॉन्स्टेबलही नव्हती. संध्याकाळी सात नंतर महिलांना पोलिस घेऊन जाऊ शकत नाही हा कायदा आहे' असं या तरुणीने टि्वट केलं. हे टि्वट मुंबई पोलिस आयुक्त, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही हालचाल पोलिसांनी केली नसून ओशिवरा पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा