राऊतांनंतर ‘या’ मंत्र्याच्या पत्नील ईडीने बजावला समन्स


राऊतांनंतर ‘या’ मंत्र्याच्या पत्नील ईडीने बजावला समन्स
SHARES

एकामागोमाग एक ईडीचा ससेमिरा हा महाविकास आघाडीतील नेत्याच्या मागे कायमचं आहे. संजय राऊत, एकनाथ खडसेंनंतर, प्रताप सरनाईकांनंतर आता महाविकास आघाडीतील एका मंत्र्याच्या पत्नीला ईडीने समन्स बजावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली भोसले यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अविनाश भोसले यांनी २००७ मध्ये परदेशातून महागड्या वस्तू आणल्याने तसेच परदेशी चलन बाळगल्याने ईडीने फेमा अंतर्गत तेव्हा तपास केला होता. २७ नोव्हेंबर २०२० रोजी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती. स्वप्नाली भोसले या अविनाश भोसले यांची कन्या असून विषयी विश्वजीत यांची पत्नी आहे. ०१९ मध्ये इन्कम टॅक्स विभागाकडून अविनाश भोसले यांच्या पुणे व मुंबईतील ठिकाणांवर सुद्धा छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वप्नाली भोसले यांच्या चौकशीसाठी ईडीने समन्स बजावला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबीयांना ईडीने नोटीस बजावली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती.

त्यानंतर PMC बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सुद्धा ईडीने नोटीस बजावली होती. वर्षा राऊत यांनी ईडीच्या चौकशीला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर वर्षा राऊत यांनी चौकशीला हजर राहून सहकार्य केले होते. त्यानंतर आता विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावल्याचे समोर आले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा