गंगाखेड शुगर कंपनीच्या गैरव्यवहारप्रकरणी, ईडीचे राज्यभरात ९ छापे

गंगाखेड शुगर अँड एनर्जी कंपनीच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबई व परभणी येथील १० ठिकाणी छापे मारले.

गंगाखेड शुगर कंपनीच्या गैरव्यवहारप्रकरणी, ईडीचे राज्यभरात ९ छापे
SHARES

गंगाखेड शुगर अँड एनर्जी कंपनीच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबई व परभणी येथील १० ठिकाणी छापे मारले. गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. कर्ज गैरव्यवहार प्रकरणी अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व इतरांच्या विरोधात  ईडीने गुन्हे दाखल केले असून त्याा करता ईडीने विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. कर्ज गैरव्यवहार प्रकरणी अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व इतरांच्या विरोधात  ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीने ही शोध मोहीम राबवली. त्यात गुट्टे यांच्याशी संबंधीत कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने ७/१२ उतारा, छायाचित्र इ. बनावट कागदपत्र तयार करून ३२८ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप केला होता. २०१५ मध्ये ६०० शेतकऱ्यांच्या नावाखाली हे कर्ज घेण्यात आले होते. या शेतकऱ्यांना आता कर्जाची रक्कम न घेतल्यामुळे बॅंकांची नोटीस आल्या असून त्यातील कर्जाची प्रत्येकी रक्कम २५ लाख रुपयांच्या वर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. त्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 


शेतकऱ्यांच्या नावाने घेतलं कर्ज

आंध्रा बॅंक, युको बॅंक, सिंडीकेट बॅंक, रत्नाकर बॅंक या बॅंकांकडून पिक कर्जाच्या नावाखाली ८ ते १० हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेतली. या कर्जाला गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. कंपनी जामिनदार आहेत. २०१२ त जुलै २०१७ या कालावधीत हे कर्ज घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यात काही मृत शेतकऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्यानावावरही कर्ज घेण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्याच नावाने बोगस बॅंक खाती तयार करण्यात आली होती. कर्जाची सर्व रक्कम या खात्यांवर जमा झाली. त्याच दिवशी कंपनीच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली. या रकमेचा काळाबाजार झाल्याचा आरोप आहे. याबाबत ईडी अधिक तपास करत आहे. 



हेही वाचा -

भांडुपमध्ये क्रिकेटपटूची हत्या



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा