Advertisement

पीएमसी घोटाल्यातील आरोपी रणजित सिंगच्या घराची ईडीकडून झडती

कर्ज परतावा समितीमध्ये असतानाही एचडीआयएलकडून कर्ज परत मिळावे. यासाठी रणजितने कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे समोर आले.

पीएमसी घोटाल्यातील आरोपी  रणजित सिंगच्या घराची ईडीकडून झडती
SHARES

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी रणजीत सिंग यांना अटक केल्यानंतर रविवारी ईडीने त्याच्या घरी छापा टाकला. ४,३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात या आठवडयाच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन ऑडीटर्सना अटक केली होती. त्यामुळे अटक आरोपींची संख्या आता ९ वर पोहचली आहे.

रणजित हा पीएमसी बॅकेच्या संचालकपदावर  होता.  तसेच कर्ज परतावा समितीमध्ये असतानाही एचडीआयएलकडून कर्ज परत मिळावे. यासाठी रणजितने कोणतेच प्रयत्न केले नसल्याचे समोर आले. सायन कोळीवाडा येथील कर्मक्षेत्र इमारतीमधील त्याच्या फ्लॅटमध्ये रविवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांना घराबाहेर ठेवण्यात आले. सुमारे दीड ते दोन तास रणजितच्या फ्लॅटमध्ये शोध मोहीम सुरू होती. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती नेमके काय लागले हे समजू शकले नाही. या झाडाझडतीनंतर रणजितला पुन्हा चौकशीसाठी नेण्यात आले. पीएमसी बँकेत घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला हे स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या घोटाळयात बँकेचे बडे अधिकारी गुंतले असल्याचे या दोघांच्या चौकशीतूनच पुढे आले. ४,३५५ कोटी रुपयांचा हा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले. ज्याचा फटका खातेदारांना बसला. आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले. ज्यामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली. काही खातेदारांनी आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवली होती. या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला.

रणजीत सिंग यांचे वडील सरदार तारा सिंग भाजपाचे माजी आमदार आहेत. १९९९ पासून सलग चार वेळा निवडणूक जिंकून ते विधानसभेवर गेले होते. यंदा वयोमानामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नव्हती. सरदार तारा सिंग आपला मुलगा रणजीत सिंगसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण भाजपाने मुलूंडमधून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली. आता मिहिर कोटेचा मुलुंडमधून आमदार आहेत.

संबंधित विषय
Advertisement