अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ, बहिणीला ईडीकडून समन्स


अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ, बहिणीला ईडीकडून समन्स
SHARES

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचे संबध पुढे आल्यानंतर केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) ड्रग्ज तस्करांची धरपकड करण्यास सुरूवात केली. त्यात अनेक बॉलिवुड सेलिब्रेटीची एनसीबीने कसून चौकशी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन रामपालच्या प्रेयसीला या प्रकरणी अटक देखील करण्यात आली. त्यानंतर अर्जुनला चौकशीला बोलावले होते. आता ईडीने अर्जुनची बहिणला देखील चौकशीसाठी समन्स बजावला आहे. रामपालकडे सापडलेल्या प्रतिबंधीत औषधांच्या प्रिस्क्रीप्शनप्रकरणी एनसीबीच्या हाती काही महत्त्वपूर्ण माहिती सापडली असून त्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येणार आहे.

हेही वाचाः- बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत

नोव्हेंबर महिन्यात अर्जून रामपाल यांच्या घराच्या तपासणीत काही प्रतिबंधीत औषधे सापडली होती. त्याबद्दल डॉक्टरांच्या दोन चिठ्ठ्या सादर करण्यात आल्या होत्या. ही औषधे आपली बहिण व कुत्र्याची असल्याचा दावा अभिनेत्याकडून करण्यात आला होता. पण याप्रकरणी संबंधीत दिल्लीतील डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीत तफावत आढळली आहे. त्यामुळे याप्रकरणी रामपालची बहिण कोमल हिला समन्स बजावण्यात आले आहे. दोन चिठ्ठ्यांच्या पडताणीबाबत ही चौकशी करण्यात येणार आहे. तत्पुर्वी अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्सचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. अर्जुन आणि गॅब्रीएला यांच्या निवासस्थानी एनसीबीने छापा घालून शोधाशोध केली होती. या कारवाईत काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याचा दावा एनसीबीने केला होता. त्याआधी एनसीबीने गॅब्रीएलाच्या भावाला लोणावळा येथून अटक केली होती. त्याच्याकडूनही काही प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केले होते.  दरम्यान, अमली पदार्थाचे सेवन, अमली पदार्थ विक्रेत्यांशी संपर्क आणि बॉलीवूडशी संबंधित व्यक्तींना अमली पदार्थाचा पुरवठा असा आरोप एनसीबीने त्याच्यावर ठेवला होता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा