“साहब इतने लोगों को धमकाया है, की अभी याद नहीं आ रहा है!” या कुख्यात गुंडाचे पोलिसांना उत्तर

मुंबईत ८०हून अधिक खंडणी आणि २५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

“साहब इतने लोगों को धमकाया है, की अभी याद नहीं आ रहा है!” या कुख्यात गुंडाचे पोलिसांना उत्तर
SHARES

ऐकेकाळी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एजाज लकडावालाचा ताबा काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी एका गुन्ह्यांत या घेतला होता. २००४ मध्ये त्याने अंधेरीतील एका हाँटेल व्यावसायिकाला धमकावले होते. या प्रकरणी एजाजला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या विरोधात मुंबईत ८०हून अधिक खंडणी आणि २५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद  आहे.

हेही वाचाः- महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा बोनस

९० च्या दशकात कुख्यात गुंड एजाज लकडावाला हा डी कंपनीसाठी काम करत होता. मात्र छोटा राजन वेगळा झाल्यानंतर एजाजनेही आपली वेगळी चूल मांडली. यावरून त्याच्यावर डी कंपनीकडून हल्ला झाला. मात्र या जिवघेण्या हल्यात कसाबसा एजाज हा वाचला. त्यानंतर त्यावे स्वतःची टोळी बनवली आणि मुंबईतील व्यावसायिक, कलाकार, उद्योगपती, व्यापारी यांना धमकवण्यास सुरूवात केली. २००४ मध्ये पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यानंतर एजाजने मलेशिया गाठले. त्या ठिकाणाहून एजाजने धमकवण्यास सुरूवात केली. याच दरम्यान त्याने अंधेरीतील एका हाँटेल व्यावसायिकाला  ५० लाखांच्या धमकीसाठी धमकावले. मात्र व्यापारीकडे डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यानंतर लकडावालाने त्याच्याजवळ ५० हजार रुपये मागितले. मात्र त्या व्यापाऱ्याने लकडावाला विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली होती. हा गुन्हा पुढे गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासा दरम्यान लकडावालाने धमकी दिली त्यावेळी तो मलेशियामध्ये होता. पण सुरक्षा यंणांच्या रडावर येऊ नये, यासाठी लकडावाला त्यावेळी अंधेरीतील बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा वापर करायचा. या टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीनेत लकडावाला कॉन्फरन्स कॉलद्वारे खंडणीसाठी धमकावायचा. त्यामुळे त्याचे लोकेशन स्पष्ठ होत नव्हते. अंधेरीतून चालणाऱ्या या बेकायदा टेलिफोन एक्सचेंजवर कारवाई झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला होता. त्यावेळी याप्रकरणी लकडवाला सोडून इतर आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते. त्याप्रकरणी लकडवाला फरार होता. अखेर त्याचा ताबा याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-९ च्या पोलिसांनी घेतला होता. सध्या याप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी लकडावालाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. त्याने “साहब इतने लोगों को धमकाया है, की अभी याद नहीं आ रहा है!” असे उत्तर देऊन पोलिसांनाच बुचकळ्यात टाकले. गुन्हे शाखेच्या कक्ष-९ कडे लकडावाला विरोधात आणखी दोन खंडणीचे गुन्हे आहेत. त्याप्रकरणी लवकरच त्याचा ताबा घेण्यात आला आहे.

हेही वाचाः- दिवसभरात ५८ पोलिस कोरोनाबाधित, आतापर्यंत २८४ पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

एजाज विरोधात हत्या, खंडणी सारख्या ८० हून अधिक तक्रारी असून मुंबईत २५ गुन्ह्यांची नोंद आहे. जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच  'डी गँग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर २ हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना. १९८७ मध्ये त्याला नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकिय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा