एकनाथ खडसे उद्या ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार


एकनाथ खडसे उद्या ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार
SHARES

 पुण्यात भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. ३० डिसेंबर २०२० रोजी खडसेंना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, समन्स मिळाल्यावर खडसे जळगावहून मुंबईला आले, पण त्यांना कोरोना झाल्याने क्वारंटाईन व्हावे लागले होते. आता उद्या क्वारंटाईन पिरिअड संपल्यावर उद्याच खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. जमीन व्यवहार या वादग्रस्त प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना २०१६ मध्ये त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आतापर्यंत याच प्रकरणी चार वेळा त्यांना चौकशीला समोरे जावे लागले आहे.

खडसे यांनी ऑक्टोबर महिन्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्याला ईडी लावली, तर आपण सीडी लावू, असे म्हटले होते. त्यानंतर आता दोन महिन्यानंतरच ईडीने मनी लाॅडरींगप्रकरणी त्यांना समन्स बजावले होते. भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री  आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना समन्य बजावले होते. तर, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून त्यासाठी ३० डिसेंबर मुंबईला जाणार आहोत, तसेच  आपण ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केले. मात्र बुधवारी त्यांना थंडी, ताप, सर्दी आणि थोडा खोकला येऊ लागला. ही कोरोनाची लक्षणं असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र त्यांना १४ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आपण ईडी कार्यालयात १४  दिवसांनी हजर राहू असं खडसेंनी स्पष्ट केले  होतं. दरम्यान शुक्रवारी सकाळी खडसे हे ईडीच्या चौकशीला हजर राहणार असल्याचे सांगितले जाते. 

हेही वाचाः- आयटी रिटर्न भरण्याची मुदत आणखी वाढवली, 'ही' आहे अंतिम तारीख

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) २०१७ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत आहे. भोसरी येथील जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुण्यातील एका व्यावसायिकाने केला होता. तक्रारीनुसार या जमीनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांमध्ये खडसेंच्या कुटुंबियांना विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.२०१८ मध्ये एसीबीने केलेल्या तपाात खडसे यांना क्लीनचीट देण्यात आली होती. त्यावेळी सरकारने एक समिती स्थापन करून तिच्या माध्यमातूनही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ईडी आता याप्रकरणी मनी लाँडरींगप्रकरणी झाली आहे का, याबाबत तपास  करणार आहे. गुन्ह्यांत सहभागी मालमत्तेतील काळा पैसा पुन्हा बाजारात फिरवण्यात आल्याबाबत तपास करण्याचा अधिकार ईडीला आहे. जून्या गुन्ह्यांच्या आधारावर प्रोव्हीजन ऑफ द प्रीव्हेंन्शन ऑफ मनी लाँडरींग अंतर्गत ईडी अशा प्रकरणात तपास करते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा