माझगावमध्ये दगडानं ठेचून वृद्धाची हत्या

मुंबईतील भायखळा परिसरात गुरूवारी एका २३ वर्षीय तरूणाने ६५ वर्षीय वृद्धाची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी संबंधिताला अटक केली आहे.

माझगावमध्ये दगडानं ठेचून वृद्धाची हत्या
SHARES

मुंबईतील भायखळा परिसरात गुरूवारी एका २३ वर्षीय तरूणाने ६५ वर्षीय वृद्धाची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी संबंधिताला अटक केली आहे.


किरकोळ वादातून हत्या

भायखळाच्या डाॅकयार्ड रोड, नयानगरमधील खाली कंपाऊडमध्ये मृत आश्रफ कादर नाखवा (६५) रहात होते. गुरूवारी सायंकाळी किरकोळ कारणांवरून हत्येतील संबंधित तरूण आणि नाखवा यांच्यात भांडण झालं. किरकोळ कारणातून वाढलेला वाद हाणामारीवर पोहोचला. त्यावेळी आरोपीने नाखवा यांच्या वयाचाही विचार न करता त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. राग अनावर झालेल्या तरूणानं जवळ पडलेला दगडाने जखमी अवस्थेत पडलेल्या नाखवा यांची दगडानं ठेचून हत्या केली. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबतची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सदर तरूणाविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. यातील तरूण हा मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.




हेही वाचा -

कळंब समुद्रावर गेलेल्या ५ जणांचा बुडून मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा