दक्षिण मुंबई मतदार संघातून ७५ लाखांची रोकड हस्तगत

तिन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असून आयकर विभागाचे उपायुक्त अधिक चौकशी करीत आहेत. या तिन्ही कारवाईत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे.

दक्षिण मुंबई मतदार संघातून ७५ लाखांची रोकड हस्तगत
SHARES

मुंबई शहरात गुरूवारी तीन वेगवेगळया ठिकाणाहून निवडणूक आयोगाच्या पथकाने ७५ लाख रुपयांची रोकड पकडली आहे.  मुंबादेवी परिसरातून १० लाख रुपये, भायखळा परिसरातील तांबीट नाका येथून ४९ लाख रुपये आणि राणीबाग येथून १५ लाख हस्तगत करण्यात आले आहेत.  या प्रकरणी निवडणूक आयोग आणि आयकरचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. 


गस्तीदरम्यान कारवाई

निवडणूक आयोगाची गुरुवारी गोल देऊळ एस.व्ही.पी. रोड या परिसरात तपासणी सुरू होती. त्यावेळी एम.एच.४ ई.एच.३२१२ या कारमध्ये प्रदिप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला हे तीन इसम होते. त्यांच्याकडे १० लाख रुपये आढळून आले. तर भायखळा परिसरात दोन ठिकाणांवरून तब्बल ६५ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. भायखळाच्या तांबीट नाका, बी.जे. रोड येथे संकेत पेखळे यांच्या तपासणी पथकाने सायंकाळी एम.एच.४३ बी.जी. २८४३ या गाडीची तपासणी केली असता, गाडीत ४९ लाख ९८ हजार ५०० रुपये सापडले.  तर निवडणूक आयोग अधिकारी अनिल रामचंद्र मोहिते यांचे पथक  ई.एम. पाटणवाला मार्ग, राणी बाग येथे गस्त घालत असताना त्यांनी  एम.एच १२ क्यू.वाय. ३९६४ या वाहनाची तपासणी केली असता, त्यात १५ लाख रुपये आढळून आले. 


५ जण ताब्यात

या तिन्ही प्रकरणांबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असून आयकर विभागाचे उपायुक्त अधिक चौकशी करीत आहेत. या तिन्ही कारवाईत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.



हेही वाचा -

विक्रोळीत भरधाव ट्रक उलटून ४ जणांचा मृत्यू

शीव परिसरातून ११ लाख ८५ हजारांची रोकड जप्त




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा