शीव परिसरातून ११ लाख ८५ हजारांची रोकड जप्त

मुंबईतल्या ताडदेव परिसरात काही दिवसांपुर्वी ५० लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता शीव परिसरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ११ लाख ८५ हजारांची रोकड जप्त केली आहे. जप्त केलेली रोकड ही बेहिशेबी असल्याचं समोत येत आहे.

शीव परिसरातून ११ लाख ८५ हजारांची रोकड जप्त
SHARES

मुंबईतल्या ताडदेव परिसरात काही दिवसांपुर्वी ५० लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केल्याची घटना ताजी असतानाच आता शीव परिसरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ११ लाख ८५ हजारांची रोकड जप्त केली आहे. जप्त केलेली रोकड ही बेहिशेबी असल्याचं समोत येत आहे. मात्र, अद्याप आरोपीचं नाव समजलं नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


२९ एप्रिल रोजी मतदान

लोकसभा निवडणूकीसाठी मुंबईत सोमवार २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळा पैसा आणि दारू मोठ्या प्रमाणावर वापरात आणण्याची शक्यता असते. त्यामुळं हे सर्व प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं महत्वाची पावलं उचलली असून, मुंबईसह देशभरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांची काळ्या पैशांवर बारिक नजर आहे.


११२ कोटी रुपये जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशांवर बारिक नजर ठेवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या विशेष पथकानं १० मार्च ते आतापर्यंत राज्यभरातून तब्बल ११२ कोटी रुपये जप्त केल्याची माहिती मिळते आहे.



हेही वाचा -

मोबाईल चोराच्या खेचाखेचीत तरूणी ट्रेनमधून खाली पडली

'मुंबईकरांनो मालमत्ता कर भरू नका' - मिलिंद देवरा



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा