Advertisement

'मुंबईकरांनो मालमत्ता कर भरू नका' - मिलिंद देवरा

'शिवसेना-भाजपनं संपूर्ण मालमत्ता कर रद्द करु असं म्हटलं होतं. मात्र, फक्त ११ टक्केच कर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळं मालमत्ता करमाफी हा देखील 'जुमला' असल्याचं समोर आलं.

'मुंबईकरांनो मालमत्ता कर भरू नका' - मिलिंद देवरा
SHARES

मुंबई महापालिका निवडणुकीतील जाहीरनाम्यात शिवसेनेनं मालमत्ता कर रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याशिवाय भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील मुंबईत मालमत्ता कर रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, युतीनं मुंबईकरांना मालमत्ता कर माफीचं फक्त स्वप्न दाखवलं. प्रत्यक्षात अमंलबजावणी केली नाही, असा आरोप काँग्रेसचे दक्षिण मुबंईचे उमेदवार आणि मुंबईचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केला आहे.


११ टक्केच कर रद्द

'शिवसेना-भाजपनं संपूर्ण मालमत्ता कर रद्द करु असं म्हटलं होतं. मात्र, फक्त ११ टक्केच कर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळं मालमत्ता करमाफी हा देखील 'जुमला' असल्याचं समोर आलं. त्याचप्रमाणं मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेनेनं घोषणा केली होती, परंतु २ वर्षे होऊनही अंमलबजावणी का केली नाही?’ असा सवाल मिलिंद देवरा यांनी उपस्थित केला आहे.


कर न भरण्याचं आवाहन

मुंबईकरांना युती सरकारनं मूर्ख बनवलं असल्याच आरोप मिलिंद देवरा यांनी केला आहे. तसंच, मुंबईकरांना मालमत्ता कर न भरण्याचं आवाहन देखील केलं आहे. त्याचप्रमाणं, शिवसेनेनं मालमत्ता कर माफ करु, असं आश्वासन देत मुंबईकरांची फसवणूक केल्याचा आरोप देखील मिलिंद देवरा यांनी केला आहे.



हेही वाचा -

'मतदान केंद्रावर रुग्णवाहिकाऐवजी गरजेनुसार वैद्यकीय सेवा पुरवली जाईल' - केंद्रीय निवडणूक आयोग

'कट-पेस्टचं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्या' - शिक्षणमंत्री विनोद तावडे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा