Advertisement

'मतदान केंद्रावर गरजेनुसार वैद्यकीय सेवा' - केंद्रीय निवडणूक आयोग

प्रत्येक मतदान केंद्रावर रुग्णवाहिका ठेवण्याची गरज नाही. गरजेनुसार मतदान केंद्रांवर प्राथमिक उपचार साहित्य आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध केली जाईल, अशी भूमिका निवडणूक आयोगानं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केली.

'मतदान केंद्रावर गरजेनुसार वैद्यकीय सेवा' - केंद्रीय निवडणूक आयोग
SHARES

मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना १५ ते २० तास सलग काम कराव लागतं. अनेकदा कामाच्या ताणामुळं कर्मचाऱ्यांची प्रकृती अस्वस्थ होते. त्याशिवाय, निवडणुकीच्या कामामुळं प्रकृती गंभीर होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसंच, मतदान केंद्रावर वृद्ध मतदार येत असून, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करणारी जनहीत याचिका वकील दिपक चट्टोपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली.


रुग्णवाहिकेची सुविधा

या सुनावणीदरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर रुग्णवाहिका ठेवण्याची गरज नाही. गरजेनुसार मतदान केंद्रांवर प्राथमिक उपचार साहित्य आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध केली जाईल, अशी भूमिका निवडणूक आयोगानं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केली.


वैद्यकीय सुविधा

निवडणूक आयोगाच्यावतीनं प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा पुरवली जाते. प्रसंगी संबंधित रुग्ण मतदार अथवा कर्मचाऱ्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात येते. त्याचप्रमाणं तातडीची आवश्‍यकता असल्यास रुग्णवाहिकाऐवजी अन्य वाहनही तिथे उपलब्ध करण्याच येणार असल्याची निवडणूक आयोगानं न्यायालयात म्हटलं.



हेही वाचा -

'कट-पेस्टचं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्या' - शिक्षणमंत्री विनोद तावडे

अखेर जेटची सेवा बुधवारी रात्रीपासून बंद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा