Advertisement

'कट-पेस्टचं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्या' - शिक्षणमंत्री विनोद तावडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणा नसून, मोदी व शहा यांच्या विरोधात सभा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. या सभांमध्ये राज ठाकरे मोदींच्या भाषणाच्या जुन्या व्हीडिओ दाखवत आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या या व्हीडिओ भाषणाबाजीला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कस-पेस्टचं राजकारण म्हटलं आहे.

'कट-पेस्टचं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्या' - शिक्षणमंत्री विनोद तावडे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणा नसून, मोदी व शहा यांच्या विरोधात सभा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. तसंच, या सभांमध्ये राज ठाकरे मोदींच्या भाषणाच्या जुन्या व्हिडिओ दाखवत आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या या व्हिडिओ भाषणाबाजीला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कट-पेस्टचं राजकारण म्हटलं आहे. त्याशिवाय, 'राज ठाकरेंना आम्ही पॉझिटीव्ह गोष्टी दाखवतो, त्यांनी आमच्यासोबत त्यांचा माणूस पाठवावा, म्हणजे डिजीटल गावची दुसरी बाजू त्यांना दिसेल. तर, राज ठाकरेंनी कट पेस्टचं राजकाणार सोडावं, सलग ठोस भूमिका घ्यावी', असा सल्ला एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना दिला.


'ठोस भूमिका घ्यावी'

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सभा घेत असून, या सभांमध्ये मोदींचे जुने व्हिडिओ दाखवत आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या दाखवलेल्या एका व्हिडिओमध्ये मोदींनी जवानांबद्दल केलेलं वक्तव्य दाखविण्यात येत आहे. यावर 'मोदी काय म्हणाले, व्यापारी हा रिस्क घेतो, तशीच सैन्याची रिस्क असते. सैन्याकडून एकही जवान शहीद न होता, सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक होणं शक्य आहे का?. सैन्य प्लॅनिंग करुन आपलं मिशन पूर्ण करतं. व्यापाऱ्यालाही अशीच रिस्क घ्यायची असते', असा अर्थ मोदींच्या त्या भाषणाचा होतो. त्यामुळं केवळ कट-पेस्टचं राजकारण न करता राज ठाकरेंनी ठोस भूमिका घ्यावी, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.


मोदी व शहांविरोधात सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यंदाची लोकसभा निवडणूक लढवत नाही आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी निवडणूक लढवणार नसलो तरी, सभा या मोदी व शहा यांच्याविरोधात असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 



हेही वाचा -

आयआयटीकडून मध्य रेल्वेच्या तीन पुलांवरील पदपथ बंद करण्याची शिफारस

उन्हाळी सुट्टीसाठी मुंबई ते करमळीसाठी १६ विशेष मेल, एक्स्प्रेस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा