Lok Sabha Election Mumbai 2019 Results

उन्हाळी सुट्टीसाठी मुंबई ते करमळीसाठी १६ विशेष मेल, एक्स्प्रेस

उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी अशा १६ जादा विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत.

SHARE

उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी अशा १६ जादा विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. 


साप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेस

०१००३ आणि ०१००४ या साप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसच्या प्रत्येकी चार फेऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी आणि करमळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १९ एप्रिल ते १० मेपर्यंत प्रत्येक शुक्रवारी चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून रात्री ८.२५ वाजता सुटणारी साप्ताहिक मेल, एक्स्प्रेस सकाळी ८.३० वाजता करमळीला पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे.


प्रत्येकी चार फेऱ्या

०१००५ आणि ०१००६ या साप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी आणि करमळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रत्येकी चार फेऱ्या २१ एप्रिल ते १२ मेपर्यंत प्रत्येक रविवारी चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणारी ही गाडी दुपारी १२.२० वाजता करमळीला पोहोचणार आहे. या मेल, एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे.हेही वाचा -

EXCLUSIVE : मालवणी ‘शेवंता’ बनली भोजपुरी ‘भाभी’संबंधित विषय