मोबाईल चोराच्या खेचाखेचीत तरूणी ट्रेनमधून खाली पडली

मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकात हातातील मोबाइल फोन हिसकावून पळ काढणाऱ्या चोरासोबत फरफटत गेल्यानं २१ वर्षीय तरुणी लोकलमधून पडल्याची घटना घडली आहे.

मोबाईल चोराच्या खेचाखेचीत तरूणी ट्रेनमधून खाली पडली
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकात हातातील मोबाइल फोन हिसकावून पळ काढणाऱ्या चोरासोबत फरफटत गेल्यानं २१ वर्षीय तरुणी लोकलमधून पडल्याची घटना घडली आहे. तरुणाीचं नाव अद्याप समजलेलं नसून, उमेश गवळी (२१) असं या मोबाईल चोराचं नाव आहे. या घटनेमध्ये तरूणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसंच, रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोराला पकडलं आहे. 


इंटर्न म्हणून कार्यरत

या घटनेमध्ये जखमी झालेली तरूणी परळमधील एका कंपनीत ती इंटर्न म्हणून काम करत असून वकिलीचं शिक्षण घेत आहे. तसंच, मंगळवारी रात्री ही घटना घडल्याचं समोर येत आहे. ही तरूणी मंगळवारी रात्री परळ स्थानकात लोकलमधील फर्स्ट क्लास डब्यात बसली. त्यानंतर ८.१५ वाजताच्या सुमारास ही लोकल कुर्ला स्थानकात पोहोचली. त्यावेळी विद्याविहार स्थानकात उतरण्यासाठी तरूणी दरवाजात उभी राहिली. त्यावेळी उमेश गवळी हा त्या डब्यात चढला, त्याचवेळी तरूणीचा मोबाईल वाजला आणि तिनं तो बाहेर काढताचं, उमेशनं तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत लोकलमधून पळ काढला. त्यावेळी तरूणीच्या हातात मोबाईलला लावलेले इअरफोन असल्यामुळं ती सुद्धा त्याच्यामागे फरफटत गेली. 


डोक्याला गंभीर दुखापत

या घटनेमध्ये तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर स्थानकात गोंधळ झालेला पाहता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार पोलिसांना समजताच त्यांनी तरुणीला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तसंच, मोबाइल घेऊन पळ काढणाऱ्या उमेशला पाठलाग करून पकडलं. या प्रकरणी उमेशची पोलिसांनी चौकशी केली असता, तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वडाळा, कुर्ला, कल्याण रेल्वे पोलीस ठाणे, नेहरू नगर शहर पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे.


डोक्याला ५ टाके

गंभीर जखमी झाली असल्यानं पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. तिच्या डोक्याला ५ टाके पडले आहेत. तसंच, 'मुलीची प्रकृती स्थिर असून, तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.



हेही वाचा -

'मुंबईकरांनो मालमत्ता कर भरू नका' - मिलिंद देवरा

'मतदान केंद्रावर गरजेनुसार वैद्यकीय सेवा' - केंद्रीय निवडणूक आयोग



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा