विक्रोळीत भरधाव ट्रक उलटून ४ जणांचा मृत्यू

मुंबईतील्या विक्रोळीतील पार्क साईट परिसरात धान्यानं भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडल्याचं समोर येत आहे. या अपघातात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच, एक जण गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे.

SHARE

मुंबईतील्या विक्रोळीतील पार्क साईट परिसरात धान्यानं भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडल्याचं समोर येत आहे. या अपघातात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच, एक जण गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमीला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


गटारत चाक अडकलं

विक्रोळी पार्कसाईट परिसरातून गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास धान्यानं भरलेला ट्रक जात होता. या ट्रकचं मागील चाक गटारात अडकल्यानं ट्रक उलटला आणि ५ ही जण ट्रक खाली चिरडले. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. 


ट्रक चालकाला अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी उलटलेला ट्रक उचलला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याशिवाय, पार्कसाईट पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.हेही वाचा -

मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय, दिल्लीवर ४० धावांनी मातसंबंधित विषय
ताज्या बातम्या