SHARE

चेंबूर - चेंबूरच्या घाटला गाव परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने बुधवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. चेतना म्हात्रे असं या मुलीचं नाव आहे. चेतना अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. मात्र काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या परीक्षेत तिला कमी गुण मिळाल्यानं ती मानसिक तणावाखाली होती. याच तणावातून तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता असून गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या