कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
SHARES

मुंबईतील एस्प्लानेड कोर्टाने कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान  ला ड्रग्ज प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज समीर खान यांची न्यायालयात हजर होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. समीर खानला ड्रग्स प्रकरणात १३ जानेवारी रोजी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्याचा एनसीबी रिमांड आज संपेला होता.

दरम्यान, मुंबईतील २०० किलो ड्रग्स जप्त केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना चौकशीसाठी बोलावले होते. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, समीर खान आणि करण सजनानी यांच्यात २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. गूगल पे च्या माध्यमातून करण सजनानी आणि समीर खान यांच्यात २०,००० रुपयांचा व्यवहार झाला. एनसीबीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हा व्यवहार ड्रग्ससंदर्भात झाला असावा. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी एनसीबीने समीर खान यापूर्वी समन्स बजावलं होतं.

एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एका कुरिअरमध्ये गांजा ताब्यात घेतला होता. त्यानंतर खार येथील करण सजनानी यांच्या घरातून देखील गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर करण सजनानी, राहिल फर्निचरवाला, शाइस्ता फर्निचरवाला आणि राम कुमार तिवारी यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या अधिक तपासात वांद्रे येथील रहिवासी आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खानचे नाव पुढे आले. त्यानंतर समीर खानला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा