हर्बल ड्रग्जसह परदेशी नागरिकाला अटक


हर्बल ड्रग्जसह परदेशी नागरिकाला अटक
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 60 किलो हर्बल ड्रग्जसह इथिओपियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हमजा अबदी (23) असं अटक आरोपीचं नाव आहे. केनियातील स्थानिक प्राधिकरणाची प्रमाणपत्रं सादर करून या आरोपीने हे हर्बल ड्रग्ज मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत दीड कोटीपेक्षा अधिक आहे.

केनियातील स्थानिक प्राधिकरणाची प्रमाणपत्र सादर करून या आरोपीने हे हर्बल ड्रग्ज मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला होता.


बंदी असताना या ड्रग्जची विक्री

भारतात ज्या प्रमाणे उत्तेजकतेसाठी तंबाखूचं सेवन केलं जातं, तसं केनिया, इथिओपिया आणि सोमालिया यांसारख्या देशांमध्ये मिराच्या पानांचा उत्तेजक म्हणून वापर केला जातो. ही पानं एम्फेटामाईन या ड्रग्जच्या सेवनाप्रमाणे नशा देतात. त्यामुळे अमेरिका, चीन, ब्रिटन, कॅनडा आदी देशांनी या हर्बल ड्रग्जवर बंदी घातली आहे. सोमालियन चाचे आणि दहशतवादी अविकसित भागांमध्ये मिराच्या पानांची शेती करून ते आंतरराष्ट्रीय बाजारात विकतात.

अशी झाली अटक

हर्बल ड्रग्ज घेऊन मोहम्मद 4 मे रोजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. सीमा शुल्क विभागाला त्याच्यावर संशय आल्याने त्याची त्यांनी झडती घेतली. त्यावेळी त्याच्या बॅगेत हे हर्बल ड्रग्ज आढळले. अधिकाऱ्यापासून वाचण्यासाठी त्याने केनिया देशाच्या कृषी विभागाचे सायटोसॅनिटरी प्रमाणपत्र आणि वनस्पतीच्या उत्पादनाबाबतचे प्रमाणपत्र सादर केलं. मुंबईत शिक्षण घेत असलेल्या इथिओपियन विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून त्याने हे ड्रग्ज आणल्याचं चौकशीत सांगितलं. त्यासाठी मोहम्मदला 1 हजार अमेरिकन डॉलर (67 हजार रुपये) मिळणार होते.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा