नापास झाली म्हणून संपवलं जीवन

 Kandivali
नापास झाली म्हणून संपवलं जीवन
नापास झाली म्हणून संपवलं जीवन
See all

कांदिवली - सीएच्या परीक्षेत नापास झाली म्हणून गळफास घेऊन एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कांदिवलीच्या चारकोप परिसरातील म्हाडा बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. अनामिका मथौली असं या 25 वर्षीय मुलीचं नाव आहे. ती गेल्या एक वर्षापासून त्रिवेणी टॉवरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. काही दिवसांपूर्वीच तिने सीएची परिक्षा दिली होती. 17 जानेवारीला तिच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यात ती नापास झाली. याच नैराश्यातून तिने हे पाऊल उचललं.

घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे तिच्या भावाने तिला फोन केला. पण बहिणीने फोन उचलला नाही म्हणून तो गुरुवारी तिच्या घरी गेला, तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने घराचा दरवाजा तोडला. आता प्रवेश केला असता अनामिका गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर याची माहिती चारकोप पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठवून अपघाती मृत्यूची नोंद करून घेतली आहे.

Loading Comments