भायखळ्यातून 2000 आणि 500 च्या बनावट नोटा जप्त

 Wadi Bunder
भायखळ्यातून 2000 आणि 500 च्या बनावट नोटा जप्त

सँडहर्स्ट रोड - डोंगरी पोलिसांनी एका कारवाईत 2000 आणि 500 च्या 32 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी वकार अहमेद अन्सारी या 21 वर्षीय तरुणाला अटक केली अाहे. 

वाडीबंदर भागातील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नाकाबंदी सुरू होती. या नाकाबंदीदरम्यान वकार तिथे आला. त्याच्या संशयित हालचालींवरुन त्याची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत त्याच्याकडून 2000 च्या 21 आणि 500 च्या 11 बनावट नोटा सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी वकारला अटक केली. वकार भायखळ्यातील मदनपूरा भागात राहत असून त्याच्याजवळ या बनावटी नोटा कुठून आल्या याचा तपास डोंगरी पोलीस करत आहेत.

Loading Comments