सावधान ! Tiktok Pro च्या फेक लिंकद्वारे ‘अशी’ होऊ शकते तुम्हची फसवणूक

नागरिकांच्या याच सवयीचा गैरफायदा घेण्यास काही समाजकंटकांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.

सावधान ! Tiktok Pro च्या फेक लिंकद्वारे ‘अशी’ होऊ शकते तुम्हची फसवणूक
SHARES

भारतात वर्षभरापासून टिक टाँक वापरणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र भारत आणि चीन मध्ये संबध खराब झाल्यामुळे सरकारने चीनला धडा शिकवण्यासाठी चीनची ५९ अँपवर भारतात बंदी आणली. ऐकाऐकी टिक टाँकची सवय सुटने कठिण आहे. नागरिकांच्या याच सवयीचा गैरफायदा घेण्यास काही समाजकंटकांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.


Tiktokवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही  या अँपचे अनेक वापरकर्ते व चाहते  इंटरनेटवर आहेत. याचा फायदा  घेण्यासाठी सायबर भामट्यांनी एक फेक Tiktok Pro लिंक बनविली आहे. लाँकडाऊनच्या काळात नागरिक घरातच असल्यामुळे इंटरनेटच्या मदतीने सोशल मिडियाचा वापर ही वाढला आहे. त्यामुळे मोबाइलवर आलेली लिंक, फोन किंवा मेसेज हा खात्री न करता उघडत आहेत.  नागरिकांची हिच सवय ओळखून  सायबर भामट्यांनी टिकटाँकच्या नावाने  फेक लिंक बनवली आहे.  त्याचा प्रसार व्हाट्सअँप मेसेजेस,व sms वर केला जातो. हि लिंक उघडल्यानंतर न कळत नागरिकांच्या मोबाइलमध्ये एक मालवेअर अपलोड होत असून तुम्हची खासगी सर्व माहिती आरोपींपर्यंत पोहचत आहे. ज्याच्या मदतीने हे सायबर चोरटे तुम्हाला ब्लॅकमेल करून तुम्हच्याकडे खंडणी मागू शकतात.  तसेच  पैशांसाठी सोशल मिडियावर तुम्हची बदनामी करू शकतात. किंवा तुम्हचेच खाते वापरून तिसऱ्या व्यक्तीकडून पैसे मागू शकतात. तसेच तुम्हाला फोन करून तुम्हची फसवणूक करू शकतात.

हेही वाचाः- लॉकडाऊनमुळं मुंबईच्या डबेवाल्यांची आर्थिक स्थिती बिकट

त्यामुळे नागरिकांना सायबर विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, असे कोणतेही मेसेजच्या लिंक खात्री न करता उघडू नये किंवा त्यावर क्लिक करु नये. तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.  असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा