नोटेवरील 'दोन हजार'च्या मागचं सत्य

 Pali Hill
नोटेवरील 'दोन हजार'च्या मागचं सत्य

मुंबई - देशभरामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकेसमोर रांगा लावून सर्वसामान्य नागरिक उभे आहेत, मात्र ज्यांना दोन हजारांच्या नोटा मिळाल्या आहेत, त्यातील काही जण सुखावले आहेत. तर काहींनी त्यामध्ये चुका शोधल्या आणि सोशल मीडियावर दावा करत आहेत की मराठीमध्ये दोन वेळा 2000 रुपये असं लिहिलं आहे. काय सत्य आहे ते पाहुयात.

सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे की, 2000 रुपयांवर दोन वेळा मराठीमध्ये दोन हजार रुपये असे लिहिलं आहे आणि बऱ्याच जणांनी या पोस्टला शेअर केलं आहे, मात्र आरबीआयकडून कसल्याही प्रकारची चूक झाली नाही, कारण दोन हजार दोन वेळा मराठीत लिहिलं नाही, एकदा कोंकणीमध्ये आणि तर दुसऱ्यांदा मराठीमध्ये दोन हजार रुपये लिहिलं आहे. कोंकणी भाषेला देशामध्ये देवनागरी लिपीमध्ये अधिकृत मान्यता आहे. कोंकणी आणि मराठी भाषांमध्ये जास्त फरक नसल्यामुळे सोशल मीडियामध्ये दोन्ही भाषांमधील फरक समजण्यात गल्लत झाली आणि चुकीची माहिती व्हायरल झाली. आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर किती भाषांना नोटांवर स्थान दिलं जातं याची क्रमवारी दिली आहे.

Loading Comments