TRP scam: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, BARC India च्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक


TRP scam: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, BARC India च्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक
SHARES

बहुचर्चित TRP scam  प्रकरणात मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ‘बार्क इंडिया’ च्या माजी अधिकाऱ्याला अटक केली आहे. रोमिल रामगहरिया (४०) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. पाच तासाच्या चौकशीनंतर त्याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्यानंतर त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाराचा चुकीचा वापर करून त्याने रिपब्लिक भारत चॅनेलच्या अधिकाऱ्यांना गोपनिय माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

हेही वाचाः- मेसेज येणार तरच कोरोना लस मिळणार- राजेश टोपे

TRP scam प्रकरणात मुंबईच्या सीआययूच्या पथकाने आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. यात प्रामुख्याने रिपब्लिक चॅनेलच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. यातील रोमिल हा बार्कच्या COO  पदावर कार्यरत असताना. त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी गोपनिय माहिती इतर आरोपींना पुरवल्याचं तपासात पुढे आल्यानंतर रोमिलला चौकशीसाठी गुरूवारी सकाळी ६ वा. ताब्यात घेतले. ५ तासाच्या चौकशीनंतर रोमिलला पोलिसांनी दुपारी १ वा. अटक केली. न्यायालयाने त्याला १९ता. पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जुलै २०२० पर्यंत त्यांनी तिथे काम केलेले आहे. सहा महिन्यापूर्वीच त्यांनी बार्कचा राजीनायमा दिलेला आहे. रोमिलने व्हाँट्स अँपच्या मदतीने २ वर्ष ही गोपनिय माहिती पुरवत असल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे.

हेही वाचाः- भारतात बंदी असूनही PUBG ठरला सर्वाधिक कमाई करणारा गेम

या प्रकरणात पोलिसांनी आता महाराष्ट्र आणि त्याबाहेरल केबल आँपरेटर यांची देखील झाडाझडती सुरू केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत २४ केबल आँपरेटरचे जबाब नोंदवले असून तब्बल ७० केबल आँपरेटर पोलिसांच्या रडारवर आहेत. मात्र या केबल आँपरेटरांना साक्षीदार म्हणून उभे केले जाणार आहेत. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात मनीलाँड्रिग झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला असून पोलिसांनी ईडी आणि सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन डिपार्टमेंटला पत्र लिहून या प्रकरणाचा अहवाल पाठवलेला आहे. पोलिसांनी जे फाँरेन्सिक आँडिट केले त्यानुसार या घोटाळ्यात तब्बल १ हजार कोटी रुपयांचे मनीलाँड्रिग झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा