प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरियाला २५ कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी अटक


प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरियाला २५ कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी अटक
SHARES

डीसी डिझाइनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरियाला २५ कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी २२ जानेवारीला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०१६ ते २०१८ च्या दरम्यान छाबरियाने एका ऑटोपार्ट विक्रेत्याकडून कारचे सुटे भाग खरेदी केली व त्याची रक्कम दिली नाही, असा छाबरियाविरोधात आरोप आहे. या व्यावसायिक चेन्नई येथील रहिवासी आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे १८ कोटी रुपये येणे बाकी आहे, पण व्याज पकडून ही रक्कम २२ कोटींपर्यंत पोहोचते. याप्रकरणी शनिवारी त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने छाबरियाला याप्रकरणी ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहेत.

नरीमन पॉईंट परिसरात एक बनावट नंबर प्लेट असलेली स्पोर्टस कार येणार आहे. त्यानुसार, सचिन वझे यांनी सापळा लावला होता. या कारच्या झडती घेतली असता, या कारवर बनावट नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याचा चेसी नंबर देखील बदलल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार छाबरियाचे बिंग फुटले. तसेच छाब्रीया याने त्याच्या कंपनीच्या माध्यमातुन १२० स्पोर्टस कार देश परदेशात विकल्या असुन, यातील सरासरी एका कारवर ४२ लाख एवढे कर्ज असल्याचे समोर आले आहे. तर यातील ९० कारमध्ये आर्थीक घोटाळा असुन, याचा अधिक तपास सुरु आहे.

त्यानुसार, पोलिसांनी ही कार ताब्यात घेत, ती बनविणा-या दिलीप छाब्रीयाला अटक केली होती. ही कार चेन्नई येथे रजिस्टर असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  क्रिकेटर दिनेश कार्तीक याने या कंपनीचा मालक छाब्रीया विरोधात न्यायालयात तक्रार केली होती. त्याने दिनेश कार्तीकला कार देतो असे सांगत ५ लाख रुपये अॅडव्हान्स घेतल्याचे देखील समोर आले होते. प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया याने कॉमेडियन कपील शर्मालाचीही साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कपील शर्माचा याचा जबाब नोंदवण्यात आला. कपील शर्माने छाबरियारियाला महागडी व्हनिटी व्हॅन बनवण्यास सांगितले होते. त्याचे सर्व पैसे शर्माने दिले होते. पण त्याबदल्यात त्याला व्हॅन मिळालीच नाही. याप्रकरणी गेल्यावर्षी कपील शर्माने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. नुकतीच कार नोंदणीप्रकरणी दिलीप छाबरियाला अटक झाल्यानंतर त्याबाबतच्या बातम्या पाहून कपील शर्मा यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांना संपर्क साधला होता

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा