मुंबईत दोन मुलींचा विनयभंग (molestattion) करणाऱ्या 42 वर्षीय पित्याला (father) निर्मल नगर पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याविरोधात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला दारूचे व्यसन असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली.
पीडित मुली 18 आणि 13 वयोगटातील आहेत. आरोपीला दारूचे व्यसन असून त्यातून त्याने गुरूवारी राहत्या घरी पीडित मुलींसमोर (daughter) अश्लील कृत्य केले. त्याला विरोध केला असता आरोपीने पत्नीलाही मारहाण केली. त्यानंतर आरोपीच्या पत्नीने याप्रकरणी स्थानिक निर्मल नगर पोलिसांकडे तक्रार केली.
दोघांपैकी एक मुलगी 13 वर्षांची असल्यामुळे याप्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी राहत्या परिसरातून आरोपी पित्याला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली. आरोपी पोलीस कोठडीत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा