हा कसला बाप ?

 Chembur
हा कसला बाप ?

गोवंडी - मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर तीन महिने बलात्कार करणाऱ्या एका पित्याला बुधवारी शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. शमशाद शेख (३५) असे या आरोपीचे नाव असून तो गोवंडी शिवाजी नगर येथे राहत होता. मुलीच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे मुलगी घरात एकटीच असल्याचा फायदा घेत हा नराधम बाप मुलीवर बलात्कार करत होता. मुलीने ही बाब तिच्या मावशीला सांगितल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Loading Comments