आयसीआयसीआय बँकेत घुसून महिला उपव्यवस्थापकाची हत्या, विरारमधील घटना

अनिल दुबेला लोकांनी पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आयसीआयसीआय बँकेत घुसून महिला उपव्यवस्थापकाची हत्या, विरारमधील घटना
SHARES

विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या एका शाखेत बँकेच्या माजी कर्मचार्‍याने हल्ला करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी बँकेतील महिला उपव्यवस्थापकाची गळा चिरून हत्या करण्यात आली. तर एका महिला खजिनदाराला जखमी केले.  

आयसीआयसीआय बँकेची विरार पूर्वेला मनवेल पाडा येथे शाखा आहे. या शाखेत गुरुवारी सायंकाळी बँकेच्या उपव्यवस्थापक योगिता वर्तक आणि खजिनदार श्वेता गंभीर या कामानिमित्त थांबल्या होत्या. यावेळी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत शिरला. त्याने योगिता यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर बँकेतील रोख रक्कम आणि सोने घेऊन पळू जात असताना खजिनदार श्वेता यांनी अनिलला विरोध केला. मात्र, त्यांने श्रद्धा यांच्यावर हल्ला केला. श्वेता यांनी यावेळी आरडाओरड केल्याने नागरिकांनी अनिलला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. 

श्वेता गंभीर जखमी झाल्या असून त्यांना खाजगी रग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल दुबेला लोकांनी पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा