घाटकोपरमध्ये चरससह महिलेला अटक

 Ghatkopar
घाटकोपरमध्ये चरससह महिलेला अटक

घाटकोपर - घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संजयनगर विभागातून शबनम जावेद शेख(२६) या महिलेला पोलिसांनी तब्बल तीन किलो सातशे ग्रॅम चरससह अटक केली आहे. या चरसची किंमत अंदाजे चार लाख रुपये आहे. ही महिला घाटकोपर तसंच कुर्ला विभागात अंमली पदार्थ विक्रीचे काम करते. या महिलेनं तब्बल चार लाख रुपयांचा चरस या ठिकाणी विक्रीला आणला असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत फड यांना गुप्त बातमीदाराद्वारे मिळाली. फड यांनी महिला पोलीस अधिकारी एकता पवार, सुनीता गायकवाड यांच्यासह अनंत मोरे, दिलीप चव्हाण, विकास होनमाणे, धनंजय मोरे, रणजित ठाकूर यांच्या मदतीने नूरानी मस्जिद कमानी या ठिकाणी सापळा रचला आणि या महिलेला अटक केली.

Loading Comments