दादर स्टेशनवरची 'ती' मारहाण सीसीटीव्हीत कैद

  मुंबई  -  

  दादर - भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश तेलीला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय. मोहित गरुड (22), आकाश साळवी (24) आणि विनीत गायकवाड (19) अशी या तरुणांची नावे आहेत. तर प्रणित खरात याला पोलिसांनी आधीच अटक केली होती. या प्रकरणी काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  प्रथमेश तेलीला दादर प्लॅटफॉर्मवर मारहाण करण्यात आली होती. याचा व्हिडिओ मुंबई लाइव्हच्या हाती लागला आहे. यात प्रथमेश तेलीला झालेल्या मारहाणीची दृश्य पाहता येतील. मंगळवारी रात्री प्रथमेश तेली हा कोकण कन्या ट्रेन पकडणार तितक्यात काही तरूण त्याला पकडतात आणि त्याला बेदम मारहाण करतात. फ्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर हे दोन तरुण प्रथमेश तेलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करतात आणि काही क्षणात सगळे तिथून पळ काढतात. पळत असतानाच प्रणित खरात नावाच्या तरूणाला पोलीस तिथेच पकडतात.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.