नशापान करण्यावरून दोन गटांत दगडफेक

  BDD Chawl
  नशापान करण्यावरून दोन गटांत दगडफेक
  मुंबई  -  

  वरळी बीडीडी चाळीत सोमवारी रात्री नशापान करण्यास मनाई केल्यामुळे तुफान दगडफेक आणि मारामारी झाली. या दगडफेकीत काही तरुण जखमी झाले असून, या प्रकरणी आतापर्यंत वरळी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.

  सांगितलं जातंय कि सोमवारी रात्रीच्या सुमारास बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक 14 च्या टेरेसवर दोन इसम गांजा पीत बसले होते. याबाबत रहिवाशांनी विचारणा केली असता या नशापान करणाऱ्यांनी रहिवाशांशी भांडण सुरू करून दगडफेक तसेच मारामारी करण्यास सुरुवात केली. यात सचिन तानाजी वाघमारे (39), राहुल त्रिभुवन (25) आणि सोनिया साळवी (21) हे जखमी झाले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी दंगलीसह खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदवला असून, 9 जणांना अटक केली आहे. तर 20 ते 25 जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.