Advertisement

सोशल मिडियावर व्यक्त होताना काळजी घ्या, सायबर पोलिसांचे आहे तुम्हच्यावर लक्ष

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ५१० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३७ N.C आहेत) नोंद २८ जुन २०२० पर्यंत झाली आहे.

सोशल मिडियावर व्यक्त होताना काळजी घ्या, सायबर पोलिसांचे आहे तुम्हच्यावर लक्ष
SHARES
Advertisement

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ५१०  गुन्हे दाखल झाले असून २६५ व्यक्तींना अटक केल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

      महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ५१०  गुन्ह्यांची (ज्यापैकी ३७ N.C आहेत) नोंद २८ जुन २०२० पर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९६ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २१३    गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २७ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी १० गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ६० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत  २६५ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

संबंधित विषय
Advertisement