ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा

या महिलेने त्यानंतर यासंदर्भात विशाखा समितीकडे तक्रार केली. मात्र तिची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने याबाबत बुधवारी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती.

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा
SHARES

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विश्वनाथ केळकर असं या आरोपीचं नाव आहे. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयामधील एका माजी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याच्या आरोप  केळकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

बुधवारी विश्वनाथ केळकर यांच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे आरोप खोटे असून दुष्ट हेतूने आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत विशाखा समितीची चौकशी सुरू आहे. या चौकशीमधून सत्य बाहेर येईल असं केळकर यांनी म्हटलं आहे. 

बाळकूम येथील ग्लोबल कोविड रुग्णालयात कंत्राटी परिचारिका म्हणून काम करणाऱ्या 30 वर्षीय महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे. परिचारिकेने डॉ. विश्वनाथ केळकर यांच्या विरोधात पालिका प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र ,त्या तक्रारींवर कुठलीच कारवाई झाली नाही.  उलट पालिका प्रशासनाने तिची कागदपत्र अपूर्ण असल्याचा ठपका ठेवत तिला कामावरून घरी बसवले होते. 

या महिलेने त्यानंतर यासंदर्भात विशाखा समितीकडे तक्रार केली. मात्र तिची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने याबाबत बुधवारी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी तत्काळ एफआयआर दाखल केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. 

त्यानुसार बुधवारी रात्री उशिरा अखेर ठाणे महापालिका उपायुक्त डॉ. विश्वनाथ केळकर यांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .या प्रकरणाचा तपास महिला पोलिस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असून याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा