फिरोज नाडियाडवालाच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणात अटक

एनसीबीने दिवसभर मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरनेसह काही भागातशोध मोहिम राबवली.

फिरोज नाडियाडवालाच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणात अटक
SHARES

बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) दिवसभर चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी शोध मोहिम राबवली. याप्रकरणी नाडियादवाला यांची पत्नी शबाना सईद(२०) हिच्यासह आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात लवकरच फिरोजची देखील चौकशी होणार असून एनसीबीने त्याला चौकशीसाठी समन्स दिल्याचे कळते.

हेही वाचाः-दिवाळीनंतर शाळा होणार सुरू , उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

एनसीबीने दिवसभर मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरनेसह काही भागातशोध मोहिम राबवली. यापूर्वी याप्रकरणी अब्दुल वाहीद ऊर्फ सुल्तान मिर्झा याला अंधेरीतील आझाद नगर परिसरातून एनसीबीच्या अधिका-यांनी अटक केली होती. त्याच्या इनोव्हा कारमधून ७५०ग्रॅम गांजा, ७५ ग्रॅम चरस, तीन ग्रॅम मेफेड्रॉन(एमडी) जप्त करण्यात आली आहे. याशिवाय एक लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कमही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. वर्सोवा, लोखंडवाला व यारी रोड परिसरात राहणा-या काही हायप्रोफाईल व्यक्तींचे संपर्क क्रमांक त्याच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत. त्याप्रकरणी सुल्तानच्या चौकशीतून त्याने शबानाला गांजा विकल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचाः-अर्णब गोस्वामीचा तुरूंगातील मुक्काम वाढला

या माहितीचया आधारे जेव्हीपीडी येथील गुलमोहोर क्रॉस लेन येथे शोध मोहिम राबवली. त्यात सुल्तानकडून खरेदी केलेलाय १० ग्रॅम गांजा सापडला. त्यानंतर शबाना सईदला एनसीबीने नोटीस पाठवून त्यांचा जबाब नोंवदला. जबाब नोंदवण्यात आल्यानंतर अखेर तिला याप्रकरणी अटक करण्यात आली. आतापर्यंत याप्रकरणी एकूण ७२७.१ ग्रॅम गांजा, ७४.१ ग्रॅम चरस व ९५.१ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत तीन लाख ५८ हजार ६१० रुपये आहे. याप्रकरणी आतापर्यंत यावेळी एनसीबीने पाच ड्रग्ज पेडलर्सना अटक केली आहे. याप्रकरणी एनसीबी अधिक तपास करत असून सुल्तान मिर्झाच्या संपर्कात असलेल्या आणखी हायप्रोफाईल ग्राहकांचा शोध सुरू आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा